चाळीसगाव, प्रतिनिधी | तालुक्यातील चैतन्य तांडा येथे वीज ग्राहकांचे तक्रार निवारणासाठी महावितरण कंपनीचे शिबीर आयोजित करण्यात आले. यावेळी एकूण २९ नवीन वीज ग्राहकांचे कनेक्शन जागेवर जोडण्यात आले. तर १६ थकबाकीदारांकडून एक लाखाची वसुली करण्यात आली.
तालुक्यातील चैतन्य तांडा येथे वीज ग्राहकांचे तक्रार निवारणासाठी महावितरण कंपनीचे एकदिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले. सदर शिबीराची सुरुवात राष्ट्रीय युवा दिनानिमित्त स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मुख्य कार्यकारी अभियंता शेंडगे यांनी अभिवादन केले. यावेळी मुख्य कार्यकारी अभियंता शेंडगे यांनी वीज ग्राहकांच्या तक्रारी समजून त्याचवेळी निवारण केले. दरम्यान महावितरण कंपनीच्या वतीने एकूण २९ नवीन वीज ग्राहकांचे कनेक्शन जागेवर जोडण्यात आले. व १६ थकबाकीदारांकडून एक लाखाची वसुली यावेळी करण्यात आली. त्यामुळे सदर शिबीराला ग्रामस्थांकडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला.
यावेळी मुख्य कार्यकारी अभियंता शेंडगे, उपअभियंता आल्तेकर, कनिष्ठ अभियंता योगेश्वर घुडगे, सरपंच अनिता राठोड, उपसरपंच आनदा राठोड, सदस्य भावलाल चव्हाण, राजेंद्र चव्हाण, प्रवीण चव्हाण, खिमा मोरसिंग राठोड, सुपदु राठोड, गोरख राठोड, जाधव (महावितरण कंपनी), माजी चेअरमन दिनकर राठोड व वीज ग्राहक उपस्थित होते. नियमांचे पालन करून सदर शिबिर उत्साहात संपन्न झाला.