यावल प्रतिनिधी । तालुक्यातील कोरपावली ते यावल हा जुना रस्ता अनेक वर्षांपासून खड्ड्यांमुळे अत्यंत दयनीय अवस्थेत असून गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. यासंदर्भात शिवसेनेतर्फे नुकतीच यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे.
याबाबत यावल शहर शिवसेना शाखेच्या वतीने गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड ( बोरसे ) यांना देण्यात आलेल्या निवेदना म्हटले आहे की , यावल ते कोरपावली हा जेटी महाजन सुतगिरणी समोरून जाणारा व अगदी कमी वेळेत कोरपावलीला जोडणारा शेतकऱ्यांच्या शेती कामांसाठी अत्यंत महत्वाचा समजला जाणारा जुना रस्ता असुन, मागील अनेक वर्षा पासुन या रस्त्याची ठीकठीकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने संपुर्ण चार ते पाच किलोमिटरच्या मार्गावरील रस्ता खड्डेमय नव्हेच तर अक्षरश : चाळण झालेली आहे . सदरचा रस्ता हा शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्वाचा असुन , शेतकरी बांधवांकडुन उत्पादीत करण्यात येणाऱ्या विविध पिकांची वाहतुक करणेसाठी या रस्त्याच्या उपयोग होतो परन्तु रस्त्या अभावी शेतकऱ्यांच्या मालाची वाहतुक करण्यासाठी वाहन येत नसल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहे . पावसाळ्यात शेतकरी बांधवांच्या केळीच्या वाहतुकीस व केळी कापणीस कुणी येत नसल्याची परिस्थितीत निर्माण झाली.
या प्रश्राकडे संबधीत विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे शिवसेनेचे म्हणने आहे. तरी यावल ते कोरपावली मार्गावरील जुना रस्त्याचे नुतनीकरण मजबुतीकरण व डांबरीकरणासह याच मार्गावर असलेल्या खडकाई नदीवर पुल बांधण्यात यावा, कारण पावळ्यात या नदीला पुर आल्यास कोरपावली गावासह शेतकऱ्यांचे आपल्या शेतीशी संपर्क तुटतो. तरी लोकप्रतिनिधींनी तात्काळ लक्ष देवुन पावसाळया आदीच या मार्गावरील रस्त्या डांबरीकरण व खडकाई नदीवरील पुल बांधणी करावी अशी मागणी करण्यात आली असुन या निवेदनावर शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख मुन्ना पाटील, तालुकाप्रमुख रविन्द्र सोनवणे , शिवसेनेचे यावल शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, संतोष धोबी, अजहर खाटीक, तालुका उपप्रमुख मुन्ना पाटील , सागर देवांग , योगेश चौधरी आदींचा स्वाक्षरी आहेत.