Home क्राईम कानळदा रोडवर भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

कानळदा रोडवर भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

0
103

जळगाव प्रतिनिधी । कानळदारोडवर भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, विकास लीलाधर चौधरी वय ५२ रा आव्हाणे ता. जळगाव हे जखमी झाले आहे. सविस्तर माहिती अशी की, आव्हाणे येथील विकास चौधरी व त्यांची पत्नी वंदनाबाई हे दोघे जण ३ जानेवारी रोजी त्यांच्या एम.एच.१९ ऐ.वाय ५८१६ या क्रमांकांच्या दुचाकीने चोपड्याकडे जात होते. यादरम्यान कानळदा गावाजवळ एम.एच.४८ ए.टी. १३३९ या क्रमांकाच्या कारने विकास चौधरी यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात विकास चौधरी यांच्या उजव्या पायाला, तसेच कमरेला व हाताला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच दुचाकीचेही नुकसान झाले आहे. अपघातानंतर कार सोडून चालक घटनास्थळाहून पसार झाला होता. याप्रकरणी जखमी विकास चौधरी यांच्या पत्नी वंदनाबाई चौधरी यांच्या तक्रारीवरुन कारचालक रविंद्र रामा कुंभार याच्या विरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.


Protected Content

Play sound