अमळनेर प्रतिनिधी । अमळनेरात सद्गुरू संत सखाराम महाराज महाराज यांचा भव्य द्विशताब्दी समाधी सोहळा सुरू असून या सोहळ्यात राज्यासह पर राज्यातून देखील विद्वान, पंडित, साधू संत, कीर्तनकार तसेच हजारो भाविक अमळनेरात येत आहेत.
अमळनेर ही संतांची पुण्यभूमी म्हणून त्यांची भावना असताना अमळनेर शहरात विविध ठिकाणी हातगाड्यांवर खुलेआम होत असलेली अवैध दारू विक्री शहराचे नाव कलंकित करीत असून एवढ्या मोठ्या उत्सवात देखील अशी परिस्थिती का? असा सवाल हे भाविक उपस्थित करीत आहे. यामुळे स्थानिक पोलिसांनी समाधी सोहळ्याचे महत्व व भाविक भक्तांच्या भावना लक्षात घेऊन किमान उत्सव काळात तरी अवैध दारू विक्रेत्याना आवर घालावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.पत्रकार बांधवांसह वाडी संस्थनच्या विश्वास्थानी देखील याबाबत खंत व्यक्त केली आहे.