आता ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा उघड करणार – सोमय्या

मुंबई प्रतिनिधी | राज्यातील महाविकास आघाडीवर अनेक घोटाळ्यांचा आरोप केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आता आपण ठाकरे सरकारचा कोविड घोटाळा बाहेर काढणार असल्याचा इशारा दिला आहे.

किरीट सोमय्या  यांनी  पुढच्या १० दिवसांत ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा उघड करणार असल्याचा इशारा सोमय्यांनी दिला आहे. कोविड सेंटर हे सत्ताधारी नेत्यांचं कमाईचं साधन असल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे.

सोमय्या यांनी मागच्या काळात महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. शेलार यांच्या आरोपांनंतर राजकारण ढवळून निघालं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी कोविड सेंटर घोटाळा उघड करण्याचा इशारा दिल्याने याला सत्ताधारी उत्तर देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

सोमय्या यांच्या दाव्यावर शिवसेनेच्या नेत्यांनी टीका केली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकर म्हणाल्या की, आपण ग्राऊंडवर जाऊन परिस्थितीची पाहणी करण्यास प्राधन्य देतो, खुर्चीत बसून बोलणं सोपं असतं, प्रत्यक्ष कमा करून दाखवा असे आव्हान त्यांनी दिले आहे.

 

Protected Content