Home आरोग्य जळगाव येथील प. वि. पाटील विद्यालयात सूर्यनमस्कार अभियान

जळगाव येथील प. वि. पाटील विद्यालयात सूर्यनमस्कार अभियान

0
50

जळगाव प्रतिनिधी । शहरातील केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प. वि. पाटील विद्यालय येथे मुख्या. रेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ कोटी सूर्यनमस्कार अभियान राबविण्यात आले.

आयुष मंत्रालय व पतंजली योग पीठ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा प्रभारी अध्यक्षा मनीषा पाटील यांनी नेहा जगताप, सीमा पाटील तसेच आपल्या टीमच्या सहकार्याने सुर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांच्या समोर करून दाखविले. विद्यार्थ्यांकडून सदरची प्रात्यक्षिके करून घेतली. विद्यार्थ्यांना सूर्यनमस्काराचे महत्त्व समजावत आपण दररोज सूर्यनमस्कार केले पाहिजेत असा सल्लाही यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आला.

कार्यक्रमासाठी धनश्री फालक, सूर्यकांत पाटील, योगेश भालेराव यांनी परिश्रम घेतले तर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound