Home क्राईम जिजाऊ नगरात चोरट्यांनी बंद घर फोडले; तालुका पोलीसात गुन्हा दाखल

जिजाऊ नगरात चोरट्यांनी बंद घर फोडले; तालुका पोलीसात गुन्हा दाखल


जळगाव प्रतिनिधी । शहरातील वाघ नगर येथून जवळ असलेल्या जिजाऊ नगर परिसरात मध्यरात्री चोरट्यांनी बंद घर फोडल्याची घटना शुक्रवारी ७ जानेवारी रोजी सकाळी उघडकीला आली आहे. चोरीत कोणताही मुद्देमाल चोरीस गेलेला नाही याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, सतिष नाना बाविस्कर (वय-३५) रा. जिजाऊ नगर, वाघ नगर परिसर जळगाव हे पत्नी अनिता व दोन मुलांसह वास्तव्याला असून ते एमआयडीसीतील खासगी कंपनीत नोकरीला आहे. गुरूवार ६ जानेवारी रोजी सतिष बाविस्कर यांची रात्रपाळीसाठी कामावर होते. त्यामुळे त्यांची पत्नी अनिता ह्या मुलगा अक्षय आणि मुलगी प्रज्ञा यांच्यासह त्यांच्या भावाच्या घरी रात्री झोपण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी घराला कुलूप लावले होते. शुक्रवार ७ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्या मुलांसह घरी गेल्या असता त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसून आले.  आत जावून पाहिले असता घरातील सामान अस्तव्यस्त झालेले दिसून आले. चोरट्यांची चोरी केल्याचा प्रकार समोर आला. चोरट्यांना घरात काहीही मुद्देमाल आढळून न आल्याने खाली हात परतावे लागले. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीसांना माहिती देण्यात आली. तालुका पोलीसांनी घटनेची माहिती घेवून पंचनामा केला आहे. याप्रकरणी सतिष बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.


Protected Content

Play sound