Home क्राईम अवैध दारूचा साठा करणाऱ्यांवर कारवाई करणार – सीमा झावरे

अवैध दारूचा साठा करणाऱ्यांवर कारवाई करणार – सीमा झावरे

0
28

रावेर प्रतिनिधी । मध्य प्रदेशातून रावेरमार्गे महाराष्ट्रात येणाऱ्या बनावट दारूच्या तस्करीचा आम्ही शोध घेत आहोत. चिनावल, खिर्डी, पाल, विवरे खुर्द परिसरातही आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि अवैध दारूचा साठा करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक सीमा झावरे यांनी सांगितले.

अवैध दारूकडे दुर्लक्ष करून माहिती देण्यास टाळाटाळ करणारे दुय्यम निरिक्षक टेंगळेच्या प्रकरणाकडे आता खुद्द उत्पादन शुल्क विभागाच्या अधिक्षकांनीच लक्ष घातल्याने अवैध दारू विक्री तसेच तस्करीला आळा बसण्याची शक्यता आहे. महामार्गाला लागूण ढाब्यावर रात्रीच्या वेळी अवैध दारू विक्री होत असल्याचे प्रकार समोर आल्या नंतर देखिल दुय्यम निरिक्षक टेंगळे यांच्या कडून कर्तव्यात कसूर करून अवैध दारू विक्री करणा-यांकडे दुर्लक्ष करत  त्यांना छुपे सहकार्य करीत असल्याची ओरड होती. माध्यमांमध्ये बातमी येताच तसेच जनतेत नाराजीचा सुर उमटताच  थातुर-मातुर चार ढाब्यांवर कारवाई करण्यात आली होती.

 


Protected Content

Play sound