जळगाव प्रतिनिधी । शहरातील स्वातंत्र्य चौकातून पायी जाणाऱ्या व्यक्तीच्या हातातून ८ हजार रूपये ठेवलेली पिशवी अज्ञात तीन जणांनी दुचाकीवरून लांबविली होती. या गुन्ह्यातील एका संशयित आरोपीला जिल्हापेठ पोलीसांनी अटक केली आहे.
याबाबत माहिती अशी की, शेख मेहबुब शेख फैयाज रा. नशिराबाद ता.जि.जळगाव हे सोमवारी ३ जानेवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास स्वातंत्र्य चौकातून पायी जात असतांना तीन अज्ञात चोरटे दुचाकीवर ट्रिपल सीट बसून त्यांच्या मागून येवून शेख मेहबुब यांच्या हातातील आठ हजार रूपये ठेवलेली रकमेची पिशवी जबरी हिसकावून लांबविल्याची घटना घडली होती. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असतांना जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी सीसीटीव्हीच्या आधारे सपोनी महेंद्र वाघमारे, पोहेकॉ महेंद्र पाटील, गणेश पाटील, सलीम तडवी, रविंद्र साळवे, विकास पहूरकर, समाधान पाटील, विनोद पाटील या पथकाने संशयित आरोपी विशाल कैलास सैंदाणे रा. कांचन नगर जळगाव याला कांचन नगर परिसरातून बुधवारी ५ जानेवारी रोजी दुपारी अटक केली आहे. त्याच्याजवळून चोरी रकमेपैकी २ हजार रूपये आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत केली आहे. सोबत असलेल्या इतर दोन साथीदारांचा शोध सुरू आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.