बोदवड प्रतिनिधी | तालुक्यात काही महिन्यांपूर्वी शेलवडला मयत लाभार्थी दाखवून बोगस शौचालय लाटल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्याला काही महिने उलटत नाही तोच आता बोगस लसीकरण दाखवून ‘कोविड १९’चे प्रमाणपत्र करण्याचे प्रकरण वैदकीय अधिकारीच्या सजगतेने उघडकीस आले आहे,
शुक्रवार, दि ३१ डिसेंबर २०२१ रोजी एणगाव येथील ‘प्राथमिक आरोग्य केंद्र’चे वैदकीय अधिकारी कपिल पवार यांनी आरोग्य पथकासह बोदवड शहरातील दत्त कॉलनी व उर्दू शाळा परिसरात दुपारी दोन वाजता लसीकरण मोहीम राबविली होती. त्यात त्यांनी दीड तासात ९८ नागरिकांचे लसीकरण केले व त्यांची नोंदही रीतसर शासकीय पोर्टलवर केली होती परंतु सदर पोर्टलवर त्यांनी नोंदणीची आकडेवारी पाहिली असता त्यावर लसीकरण मात्र १४४ नागरिक झालेले दिसून आले.
यावरून त्यांनी आरोग्य सेविका यांच्याशी विचारणा करत त्यानी रजिस्टरमाधील नोंदी तपासून पाहिल्यावर ९८ नागरिकांनी लस घेतल्याचे दिसून आले तर पोर्टलवर मात्र त्या व्यतिरिक्त लसीकरण न करताच ४५ नावांच्या लसीकरणची नोंद झाल्याचे दिसून आले. या संदर्भात त्यांनी डेटा ऑपरेटरशी चर्चा केल्यानंतर सदर लसीकरणची नोंद करणारे पोर्टल अज्ञात व्यक्तीने हॅक करत या नोंदी केल्याचे सांगण्यात आले.
सदर याबाबत फिर्यादी एणगाव येथील प्राथमिक आरोग्य अधिकारी कपिल पवार यांनी बोदवड पोलीसात त्या ४५ नागरिकांविरोधात विरुद्ध बोदवड पोलीसात तक्रार दाखल केली आहे.