यावल येथील तरूणाचा पुण्यातील अपघातात मृत्यू; यावल शहरात शोककळा

यावल प्रतिनिधी । यावल शहरातील व्यास नगरात राहणारा तरूणाचा पुण्यातील नवले पुलाजवळ मंगळवारी २८ डिसेंबर रोजी सकाळी झालेल्या विचित्र अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे यावल शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

हेमंत यशवंत तळेले रा. व्यास नगर यावल असे अपघातात ठार झालेल्या तरूणाचे नाव आहे. या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, हेमंत तळेले हा तरूण आपल्या आईसह यावल शहरातील व्यास नगरात वास्तव्याला आहे. हेमंत तळेले हा नोकरीच्या निमित्ताने दोन महिन्यांपुर्वी पुण्यात गेला होता. मंगळवारी २८ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास  मुंबई-बंगळूर महामार्गावरील नवले पुलावर विचित्र अपघात झाला. डिझेल संपल्यामुळे रस्त्याच्या मधोमध बंद पडलेला ट्रक नंतर डिझेल टाकून सुरू करत असताना ब्रेक फेल झाले आणि हा कंटेनर ७०च्या स्पीडने रिव्हर्स गेला आणि हा अपघात झाला आहे. या अपघातात हेमंत तळेले याचा तरूणासह इतर दोन जणांचा देखील मृत्यू झाला आहे. एकुलता एका मुलाच्या मृत्यूची वार्ता आईला कळल्यानंतर त्यांनी हंबरडा फोडला आहे. मिळालेल्या सुत्रानुसार मयत तरूणाची आई पुण्याकडे रवाना झाली असून आज रात्री उशीरापर्यंत यावल शहरात मृतदेह आणण्यात येणार आहे. या घटनेमुळे यावल शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

Protected Content