Home अर्थ जळगाव जिल्हा शैक्षणिक संस्था चालक संघटनेच्या संचालकपदी डॉ.नरेन्द्र कोल्हे

जळगाव जिल्हा शैक्षणिक संस्था चालक संघटनेच्या संचालकपदी डॉ.नरेन्द्र कोल्हे

0
39

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील बामणोद येथील भारतीय जनता पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष तथा यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ. नरेंद्र कोल्हे यांची जळगाव जिल्हा शैक्षणिक संस्था चालक संघटनेच्या संचालकपदी निवड करण्यात आली आहे.

जळगाव येथील आर.आर विद्यालयात दि.२६ डिसेंबर २१ रोजी जिल्हा शैक्षणिक संस्था चालक संघटना जळगावची सर्वसाधारण वार्षीक सभा संपन्न होवुन यात संस्थेच्या संचालक पदाकरिता झालेल्या निवडणुकीत ५९ सभासदांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यात यावल तालुक्यातील बामणोद येथील सामाजिक व शैक्षणिक चळवळीतील कार्यकर्ते डॉ. नरेन्द्र वामन कोल्हे यांची संचालक पदावर निवड करण्यात आली आहे. डॉ. नरेन्द्र कोल्हे यांच्या निवडीबद्दल रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे, आमदार राजुमामा भोळे, आमदार संजय सावकारे, अमोल जावळे, भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, यावलचे नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे, भाजपाचे तालुका सरचिटणीस विलास चौधरी, उजैनसिंग राजपुत, कृषी उत्पन्नचे माजी सभापती हिरालाल व्यंकट चौधरी व नारायण चौधरी, भाजयुवा मोर्चाचे राकेश फेगडे आदींनी त्यांचे स्वागत केले आहे.

 


Protected Content

Play sound