Home क्राईम दोन लाखासाठी विवाहितेचा छळ; शहर पोलीसात गुन्हा

दोन लाखासाठी विवाहितेचा छळ; शहर पोलीसात गुन्हा

0
40


जळगाव प्रतिनिधी । शहरातील गेंदालाल मिल परिसरात राहणाऱ्या विवाहितेला दोन लाखासाठी मारहाण करणाऱ्या पतीसह नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, जळगाव शहरातील गेंदालाल मील परिसरातील माहेर असलेल्या परविनबी अशफाक यांचा विवाह मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथील अशफाक मोहम्मद लालू यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्न झाल्यापासून कोणत्याही कारणावरून पती अशफाक याने विवाहितेला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर विवाहितेला सासू व सासरे यांनी घरात सामान घेण्यासाठी माहेरहून २ लाख रूपये आणावे अशी मागणी केली. आईवडीलांची परिस्थिती नाजूक असल्याने पैसे देऊ शकत नाही असे सांगितल्यावर विवाहितेच्या सासूने शिवीगाळ केली तर पती याने मारहाण केली. हा त्रास सहन न झाल्याने विवाहिता गेंदालाल मील जळगाव येथे माहेरी निघून आल्या. विवाहितेने शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती अशफाक मोहमंद लालू, सासू जहारा मोहम्मद लालू, दिर इजाज मोहम्मद लालू, सासरे आजम नुरा पहलवान, नणंद कलिम उर्फ गुड्डी, जेठ हिनफ जब्बार, फुफा सासरे कमरूद्दीन डॉक्टर, नणंद फरजाना साधिक सर्व रा. बुऱ्हाणपुर मध्यप्रदेश आणि नंदोई अलिम अख्तर रा. उज्जैन मध्यप्रदेश यांच्या विरोधात शनिवार २५ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक करूणा सागर करीत आहे.

 


Protected Content

Play sound