यावल प्रतिनिधी । यावल शहरातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी २५ डिसेंबर रोजी दुपारी उघडकीला आला. याप्रकरणी सायंकाळी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, यावल शहरातील एका भागात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शनिवारी २५ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळविले. मुलीच्या नातेवाईकांनी गावात, परिसरातील आणि नातेवाईकांकडे शोधाशोध केली. परंतु अल्पवयीन मुलगी कुठेच आढळून आले नाही. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात सायंकाळी ७ वाजता अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमजत पठाण करीत आहे.