पाचोऱ्यात प्रभाग क्रं. १२ मध्ये मोफत ई – श्रमिक कार्डचे वाटप

पाचोरा, प्रतिनिधी | पाचोरा येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने केंद्र प्रभाग क्रं. १२ मध्ये केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रभागातील लोकांना मोफत ई – श्रमिक कार्ड तयार करुन मोफत वाटप करण्यात आले.

पाचोरा येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मध्यमातून देशाच्या गोरगरीब जनतेला केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ मिळावा यासाठी जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेश पाटील यांच्या मार्गदर्शनातून पाचोरा शहरात भा.ज.पा. तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या नेतृत्वात शहराध्यक्ष समाधान मुळे यांचा वतीने प्रभाग क्रं. १२ मध्ये मोफत ई – श्रमिक कार्ड तयार करुन मोफत वाटप करण्यात आले.

केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ सर्व सामान्य कष्टकरी लोकांना मिळावा यासाठी प्रभागात भारतीय जनता युवा मोर्च्याच्या सहकार्याने प्रत्येक नागरिकाला मोफत ई श्रमिक कार्ड वाटप करण्यात आले. यावेळी भाजयुमो सरचिटणीस योगेश ठाकुर, कुमार खेड़कर, भाजयुमो उपाध्यक्ष वीरेंद्र चौधरी, भावेश पटेल, दिनेश बोरसे, राहुल नवले, आकाश पाटील, निवृत्ती हटकर, आकाश रत्नानी, अमित शामनानी, विकास बिराडे, महेंद्र चौधरी, विजय देवरे, सागर वाघ, आदींची उपस्थिती होती.

 

Protected Content