जळगावात विवाहितेचा विनयभंग; तरूणावर गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । शहरातील एका भागात राहणाऱ्या २२ वर्षीय शिक्षिकेचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. शहर पोलिस ठाण्यात एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील एका भागात २२ वर्षीय शिक्षिका आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. त्या एका उर्दू शाळेत शिक्षिका म्हणून काम करतात. गेल्या दोन महिन्यांपासून अकील शरीफ खान (वय-३२) रा. जळगाव हा शिक्षिकेचा पाठलाग करत होता.  बुधवारी २२ डिसेंबर रोजी असाच पाठलाग करत महिलेकडे पाहून अश्लील चाळे व इशारे करून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी शिक्षिकेने शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तरूणाविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी अकिल शरीफ खान रा. शाहूनगर याच्याविरोधात बुधवार २२ डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजता शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक धनराज निकुंभ करीत आहे.

Protected Content