शेंदुर्णी-नाचनखेडा गटात अडीच कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ

शेंदुर्णी प्रतिनिधी । येथील नाचणखेडा जिल्हा परिषद गटातील मोराड तालुका जामनेर येथील मोराड ते जिल्हा परिषद गट हद्दीतील रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण व मारोती मंदिर चौकात पेव्हिंग ब्लॉक टाकण्याच्या अडीच कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ जि.प.सदस्या सरोजिनी गरुड व स्नेहदीप गरुड यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी मोराड उपसरपंच योगेश राठोड, ग्रामपंचायत सदस्य विजय पवार, रशीद तडवी, सिताराम चव्हाण यांचे हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी अरुण पाटील, दशरथ चव्हान,विजय पाटील, रविंद्र पाटील, गजानन चव्हान,भगवान गायकवाड, रविंद्र बोरसे,अरुण राठोड इत्यादी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

वरील कार्यक्रमानंतर गोंदेगाव तालुका जामनेर येथे गोंदेगाव- चिलगाव रस्ता मजबुतीकरण, डांबरीकरण, गोंदेगाव येथील नविन अंगणवाडी भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्या सरोजिनी संजय गरूड, कविता चव्हाण, गोंदेगाव ग्रामपंचायत सदस्या संगीता खाकरे, विद्या खाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर अनुसूचित जाती उपाय योजना अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण व समाजमंदिर दुरुस्ती करणे इत्यादी कामांचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते संजय गरुड, स्नेहदीप गरूड, सरपंच देवानंद शिंदे, उपसरपंच दिलीप तडवी यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी पोलीस पाटील, विलास खाकरे, माजी सरपंच सुरेश खाकरे, सदस्य गोविंदा मगरे, गजानन गव्हाड, संतोष सुलताने, सतिश खाकरे, निलेश खाकरे, विजय शेवतकर, शांताराम पवार, भगवान खाकरे, वैभव डिगावकर, आकाश खाकरे, प्रवीण डिगावकर, वैभव पवार विविध पदाधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.

शेंदुर्णी-लिहा दिगर, या ६ किलोमीटर रस्त्याचे खडीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण तसेच पेव्हर ब्लॉक बसविणे कामाचा शुभारंभ लिहा दिगर येथे जलगांव जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते संजय गरूड गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सरोजिनी गरूड, पंचायत समिती सदस्या कविता चव्हाण, स्नेहदीप गरुड यांचे हस्ते विलास अहिरे, धीरज जैन तसेच लिहा ग्रामपंचायत सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते व गावकरी मंडळी उपस्थितीत करण्यात आला. जिल्हा परिषद जामनेर उपविभाग अभियंता, नितीन घोडके, राणे व सुपर वायझर हेमंत गरूड उपसथित होते.

 

Protected Content