Home धर्म-समाज मुक्ताईनगर पोटनिवडणुक निकाल : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व

मुक्ताईनगर पोटनिवडणुक निकाल : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व

0
68

मुक्ताईनगर प्रतिनिधी । तालुक्यातील वढोदा, दुई, महालखेडा, थेरोळा चिंचखेडा बु येथे एकूण 6 रिक्त ग्रामपंचायत सदस्य पदासाठी मंगळवारी पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून त्यात राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांनी 6 पैकी 5 जागांवर तर शिवसेनेच्या उमेदवाराने 1 जागा जिंकली आहे.

यात राष्ट्रवादी काँग्रेस वढोदा येथे वॉर्ड नं 4 मधून भास्करराव पाटील, थेरोळा येथे वॉर्ड न 1 मधून देविदास कांडेलकर, चिंचखेडा बु येथे वॉर्ड नं 2 मध्ये ज्योती कांडेलकर, दुई येथे वॉर्ड नं 1 मध्ये बेबाबाई उखर्डा भिल, महालखेडा येथे वॉर्ड नं 1मध्ये मनिषा कांडेलकर यांचा निवडणुकीत विजय झाला आहे. तर हलखेडा येथे सोनल पवार या बिनविरोध निवडून आल्या आहेत. बोदवड तालुक्यात कोल्हाडी येथे वॉर्ड क्र 1 मधुन भिमा सूर्यवंशी हे विजयी झाले आहेत.

यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध होत आहे. सर्व विजयी उमेदवारांचे माजी मंत्री एकनाथराव खडसे, जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, माजी जिल्हा बँकेच्या अध्यक्ष रोहिणीताई खडसे खेवलकर यांनी अभिनंदन केले. विजया नंतर विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी फटाके फोडून व गुलाल उधळून विजयी जल्लोष केला.

 


Protected Content

Play sound