चाळीसगाव, प्रतिनिधी | शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे. त्यामुळे पालकांवर उपाशी राहण्याची वेळ आली तर रहा परंतु मुलांना शिकवा असे मौल्यवान संदेश ह.भ.पा. राधाताई पाटील यांनी दिले आहेत. ते संत गाडगेबाबांची पुण्यतिथीनिमित्त बोलत होते.
संत गाडगेबाबा यांच्या ६५ व्या पुण्यतिथीनिमित्त चाळीसगाव परीट सेवा मंडळ व नेताजी पालकर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने किर्तनाचे आयोजन शहरातील नेताजी चौकात करण्यात आले. यावेळी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून माजी आमदार राजीव देशमुख यांनी अभिवादन केले. दरम्यान शिक्षण हे वाघीणीचे दुध असून पालकांवर उपाशी राहण्याची वेळ आली तरी चालेल परंतु मुलांना शिकवा असे मौल्यवान संदेश ह.भ.पा. राधाताई पाटील यांनी यावेळी दिले.
याप्रसंगी दैनिक ग्रामस्थांचे किसनराव जोर्वेकर , अरूणा किसनराव जोर्वेकर , नगरसेवक सुरेश स्वार , महेंद्र पाटील, नगरसेवक रामचंद्र जाधव , राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष शाम देशमुख, सूर्यकांत ठाकूर , डी. एस. मराठे , रविंद्र अमुतकार , मेरा गाव मेरा तीर्थ अभियनांचे विजय शर्मा , खुशाल पाटील , किशोर पाटील, मंगेश शर्मा, अनिल बोरसे, संदिप सपके, कैलास मांडोळे , रमेश सपकाळे , जितेंद्र जाधव, भगवान पवार , नितीन वाल्हे , नारायण जाधव, नरेंद्र कापडे, प्रकाश मांडोळे , रमेश रोकडे , दिपक सुर्यवंशी , भुषण अहिरे, रमेश सपकाळे , योगेश जोर्वेकर, हेमराज सुर्यवंशी, विजय देसले,वासु सुर्यवंशी,लकेश शर्मा, रोहित शिंदे ,आण्णा विसपुते , नथा रावते मंगेश निंबाळकर सागर चव्हाण, महेंद्र सुर्यवंशी , गणेश बच्छाव, प्रकाश माने , संजय अहिरे , योगेश मांडोळे , सोनु पवार,महेश राजपूत, शिवाजी सुर्यवंशी, सोमनाथ पवार, सुमित पवार, गोलु पाटील, नरेंद्र सुर्यवंशी, राजेंद्र बच्छाव, विठ्ठल पवार , आबा पोलीस ( तरवाडे ) व संत गाडगेबाबा परिट सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.