Home क्राईम भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला उडविले

भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला उडविले

0
137

धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव येथून जवळ असलेल्या बांभोरी येथून पेट्रोल घेवून घरी जाणाऱ्या तरूणाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. ही घटना दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. योगेश मराठे (वय-१९) रा. बोरगाव ता. धरणगाव असे मयत तरूणाचे नाव आहे.

 

याबाबत माहिती अशी की, योगेश मराठे हा तरूण (एमएच १९ डीयू ५३७९) क्रमांकाच्या दुचाकीने गावापासून जवळ असलेल्या बांभोरी येथे पेट्रोल घेण्यासाठी आला होती. दुपारी ३ वाजेच्या सुमारास पेट्रोल घेवून परत गावाकडे जात असतांना समोरून अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने योगेश मराठे हा जागीच ठार झाला आहे. घटनेची माहिती मिळाला धरणगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली आहे. मृतदेह धरणगाव ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.


Protected Content

Play sound