Home Cities चाळीसगाव आमदार उन्मेष पाटील यांना विजयाचा विश्‍वास ( व्हिडीओ )

आमदार उन्मेष पाटील यांना विजयाचा विश्‍वास ( व्हिडीओ )

0
42

चाळीसगाव प्रतिनिधी । जळगाव लोकसभेचे महायुतीचे उमेदवार आमदार उन्मेष पाटील यांनी आज सकाळी आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मोदींच्या विचारावर देश शिक्कामोर्तब करणार असल्याचा आशावाद व्यक्त केला.

दरेगाव येथील प्राथमिक शाळेत आमदार उन्मेष पाटील यांनी मतदान केले. याप्रसंगी त्यांच्यासोबत त्यांच्या सौभाग्यवती संपदा पाटील यादेखील होत्या. मतदान केल्यानंतर उन्मेष पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना म्हटले की, मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आणि आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. यामुळे देश पुन्हा एकदा मोदींच्या विचारावर शिक्कामोर्तब करणार असल्याचा आशावाद उन्मेष पाटील यांनी व्यक्त केला.

पहा : नेमके काय म्हणाले आमदार उन्मेष पाटील !


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound