Home आरोग्य कोरोना : जिल्ह्यात आज आढळला एक बाधित रुग्ण

कोरोना : जिल्ह्यात आज आढळला एक बाधित रुग्ण

0
44


जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालानुसार आज दिवसभरात एक कोरोना बाधित रुग्ण आढळून आला आहे. तर एक रुग्ण कोरोनामुक्त होऊन, घरी पोहचला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातून एक बाधित रूग्ण आढळला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ८०५ बाधित रूग्ण आढळून आले होते. त्यापैकी १ लाख ४० हजार २२३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ५७७ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ४ ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

 

 

 


Protected Content

Play sound