वरणगाव प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा शिवारातून महावितरण कंपनीची २६ हजार ६४० रूपये किंमतीच्या विद्यूत वाहिनीचे वीज तारा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा शिवारात असलेले महावितरण कंपनीच्या मालकीचे २६ हजार ६४० रूपये किंमतीचे लघुदाब विद्यूत वाहिनीचे सहा गाळ्याचे वीज वाहक तार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे सोमवारी १३ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी वरीष्ठा तंत्रज्ञ रविंद्र शांताराम जवरे (वय-३२) रा. हरताळा ता. मुक्ताईनगर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मुकेश जाधव करीत आहे.