Home Cities अमळनेर भारतीय कृषि अनुसंधान परिषद समितीवर दिनेश पाटील यांची नियुक्ती

भारतीय कृषि अनुसंधान परिषद समितीवर दिनेश पाटील यांची नियुक्ती


अमळनेर प्रतिनिधी । भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या सदस्यपदी तालुक्यातील दहीवद येथील दिनेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही निवड परिषदेचे अध्यक्ष नरेंद्रसिंह तोमर यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे.

याबाबत अपर सचिव संजय गर्ग यांचे नियुक्तीपत्र प्राप्त झाले आहे. भारतातून एकुण ९ कृषिविशेतज्ञ यांची निवड करण्यात आली असून यात दिनेश पाटील याचा समावेश आहे.

दिनेश पाटील हे मूळचे, दहिवद ता अमळनेर जिल्हा जळगाव येथील भूमिपुत्र आहेत. सद्या दुर्ग, छत्तीसगड येथे वास्तव्यास आहेत. सामाजिक क्षेत्रात त्याचं महत्वाचे योगदान आहे. तसेच ते मितभाषी व कृषी क्षेत्रात त्यांना खूप मोठा अनुभव आहे. कृषी क्षेत्रात नविन बदल व जैविक पध्दतीने माती व उत्पन्न यांच्यावर त्याचे महत्वाचे कार्य आहे. गौ-संवर्धन वर त्याचं विषेश प्रयत्न आहेत. त्यांचा हा अनुभव भारतात शेतकरी बांधवांना महत्वाचे मार्गदर्शन लाभणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तो फायदा होणार आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र कौतूक होत आहे.


Protected Content

Play sound