Home धर्म-समाज फैजपूर येथे खंडोबा मंदीरात चंपाषष्ठी उत्साहात साजरी

फैजपूर येथे खंडोबा मंदीरात चंपाषष्ठी उत्साहात साजरी

0
47

 

फैजपूर ता. यावल प्रतिनिधी । प्रति जेजूरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फैजपूर येथील खंडोबा मदिरात गुरूवारी ९ डिसेंबर रोजी गादीपती महामंडलेश्वर श्री श्री १००८ पुरूषोत्तम दास महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली चंपाषष्ठी ही पारंपारिक पध्तीने धार्मिक पुजा, अनुष्ठान सोहळा आयोजित करण्यात आला.

मोठ्या भक्तिभावात व जल्लोषात चंपाषष्ठी महोत्सव खंडोबा मंदिरात उत्साहात साजरा करण्यात आली. गुरूवारी ९ सप्टेंबर रोजी सकाळपासून जिल्हाभरातून भक्तांनी फैजपूर येथील खंडोबा मंदिरात गर्दी झाली होती. सकाळी ६ वाजता सराफ परिवारातर्फे महापूजा, अभिषेक पूजा करून आरत्या लावण्यात आले. त्यानंतर महाआरती करण्यात आली.

यात हळदीचा भंडारा करण्यात आला. यावेळी भक्तांसह पुरोहित उन्मेश दिक्षी यांनी संपूर्ण धार्मिक विधी पार पाडला. त्यानंतर महंत घनश्याम दाजी महाराज सभागृहात रावेर- यावल तालुक्यातील स्वामी सेवेकरी भक्त भाविकांनी सामूहिक मल्हारी सप्तशती पाठ होमहवन व तळी भरण्याचा धार्मिक कार्यक्रम पार पडला. यावेळी पुजारी राममनोहरदासजी महाराज, भागवत दासी महाराज, पवनदासजी महाराज, जितेंद्र वर्मा, डॉ, मिलिंद वायकोळे यांच्यासह गावातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound