यावल, प्रतिनिधी | येथील युवा सामाजिक कार्यकर्त अनिल जंजाळे व अमोल भिरूड यांची आमदार शिरीष चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली नगरपालीकास्तरिय दक्षता समितीच्या अशासकीय सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या नियमानुसार जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी यावल नगरपालिकास्तरिय समिती जाहीर केली आहे. यावल रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली नगरपालीका स्तरिय दक्षता समितीच्या अशासकीय सदस्यांची पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या शिफारशी वरून अशासकीय सदस्यपदी अनिल निळ्कंठ जंजाळे , खरेदी विक्री सहकारी संघाचे संचालक अमोल सुर्यकांत भिरूड, शिवसेनेचे शहरप्रमुख जगदीश रत्नाकर कवडीवाले, निलेश काशिनाथ बेलदार ,यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले , कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे, शिवसेना तालुका प्रमुख रविन्द्र सोनवणे यांच्यासह महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी यांनी या निवडीचे स्वागत केले आहे .