जळगाव प्रतिनिधी । डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नुतन मराठा महाविद्यालय जळगाव मराठी विभाग आणि अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी प्राध्यापिका डॉक्टर सुषमा तायडे यांनी ‘समग्र बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयाचे वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ राजेंद्र देशमुख सर अध्यक्ष म्हणून उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. एन. जे .पाटील सर व विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ .आर. बी. देशमुख सर उपस्थित होते. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा व्यवस्थापन परिषद सदस्य क. ब. चौ. उमवि, जळगाव डॉ .एल. पी. देशमुख देखील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ राजेंद्र देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना उजाळा दिला..या वेळी महाविद्यालयातील प्रा.डी.आर.चव्हाण,प्रा.अविनाश बडगुजर,प्रा.अफाक शेख,प्रा.राहुल संदनशीव, प्रा.बी.सी.पाटील व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख सौ .एल. एस. हिंगोणेकर यांनी केले तर सूत्रसंचालन भाग्यश्री होले यांनी केले, प्रमुख पाहुणे आणि वक्तयांचा परिचय मनिषा पारधी यांनी व आभार प्रदर्शन प्रा रत्नाकर कोळी यांनी केले.