Home क्राईम यावल तालुक्यातील एका आरोग्य केंद्रातील महिला शिपाईचा विनयभंग

यावल तालुक्यातील एका आरोग्य केंद्रातील महिला शिपाईचा विनयभंग


यावल प्रतिनिधी । तालुक्यातील एका आरोग्य केंद्रात शिपाई म्हणून काम करणाऱ्या ३३ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील रहिवाशी असलेली ३३ वर्षीय विवाहिता ही तालुक्यातील एका आरोग्य केंद्रावर शिपाई पदावर काम करते. २ डिसेंबर रोजी दिवसभर काम आटोपून महिला शिपाई यांनी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्रावर काम करणारा मिलींद साहेबराव जंजाळे (वय-३२) यांच्या दवाखान्याची चाबी देत असतांना मिलींद यांने महिलेच्या गालावर हात फिरवत तिच्या हाताला स्पर्श करत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याप्रकरणी महिला शिपाईने रात्री ८.३० वाजता यावल पोलीस ठाणे  गाठून तक्रार दिली. महिलेच्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात संशयित आरोपी मिलीद जंजाळे याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोहेकॉ सिकंदर तडवी करीत आहे.


Protected Content

Play sound