Home प्रशासन तुमच्यापेक्षा आमचा स्ट्राईक रेट जास्त ! : फडणवीस

तुमच्यापेक्षा आमचा स्ट्राईक रेट जास्त ! : फडणवीस

0
30

 

मुंबई प्रतिनिधी | संजय राऊत इतक्या मोठ्या बाता करतात, तुमच्या पेक्षा आमचा स्ट्राईक रेट जास्त होता हे लक्षात ठेवा अशा शब्दांमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौर्‍यावरून  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा पराभव झाल्यावरून संजय राऊतांनी अनेकदा भाजपावर निशाणा साधला आहे. आज देखील पश्चिम बंगालच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी भाजपावर टीका केल्यानंतर त्यावर फडणवीसांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत इतक्या मोठ्या बाता करतायत, त्यांचे किती निवडून आले? ५६ निवडून आले आहेत. त्यांचा ४०-४२ टक्के असा पासिंग स्ट्राईकरेट होता. आमचा ७० टक्के होता. त्यामुळे कुणाला महाराष्ट्रातल्या लोकांनी पळवून लावलं हे निवडणुकीतून स्पष्ट झालंय, ते पुढच्या निवडणुकीतही स्पष्ट होईल, असं फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान,फडणवीस पुढे म्हणाले की, मला वाटतं की संजय राऊत असतील किंवा शिवसेना असेल, यांनी कितीही लांगुलचालन केलं, तरी त्यांना फायदा होणार नाही. पण एक चांगलंय. आता मतांच्या लाचारीमध्ये त्यांना हिंदुत्वविरोधी पक्षांना डोक्यावर घेऊन हिंडावं लागतं, हा त्यांचा खरा चेहरा आता उघड झाला आहे, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

 


Protected Content

Play sound