विद्यार्थ्याच्या हातातील मोबाईल हिसकवला; गुन्हा दाखल

 

जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्गावर आयएमआर महाविद्यालयाजवळ १९ वर्षीय विद्यार्थी कानाला मोबाईल लावून बोलत असतांना अज्ञात दोन भामट्यांनी मागून दुचाकीवर येवून मोबाईल लांबविल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, हर्षल जितेंद्र पाटील (वय-१९) रा. विद्यासागर शिंदखेडा जि. धुळे ह.मु. शिवकॉलनी जळगाव. हा विद्यार्थी राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या आयएमआर महाविद्यालयात बीसीए चे शिक्षण घेत आहे. ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास आयएमआर महाविद्यालयासमोरून मोबाईलवर बोलत पायी जात होता. त्याचवेळी विद्यार्थ्याच्या मागून दोन अज्ञात चोरटे दुचाकीवर येवून हातातील १५ हजार रूपये किंमतीचा मोबाईल हिसकावून दुचाकीने पळ काढला. याप्रकरणी विद्यार्थ्याने जिल्हापेठ पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि महेंद्र वाघमारे करीत आहे.

Protected Content