Home क्राईम जळगावात बंद घर फोडले ; सोने,चांदीचे दागिने लंपास

जळगावात बंद घर फोडले ; सोने,चांदीचे दागिने लंपास


JALGAON CHORI

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील गणपती नगरमधील वैभव कॉलनीत बंद घर फोडत अज्ञात चोरट्यांनी सोने,चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली आहे. या चोरीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.

 

या संदर्भात अधिक असे की, गणपती नगरमधील वैभव कॉलनीत शरद अनंत वाणी हे आपल्या पत्नीसह १९ एप्रिल रोजी औरंगाबाद येथे लग्नासाठी गेले होते. लग्न आटोपून पाटील दाम्पत्य आज २१ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास घरी परतले. त्यावेळी शरद पाटील यांना घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडलेले दिसले. श्री.पाटील हे घरात गेले असता. पंखा व लाईट सुरु होता. तर लाकडी कपाटचे कुलूप तोडलेले दिसले. अज्ञात चोरट्यांनी घरातील सर्व समान अस्थव्यस्थ केलेला होता. चोरट्यांनी कपाटात ठेवलेली १० सोन्याची ग्रॅमची पोत, ३ ग्रॅमची सोन्याची नथ, ३ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, ३ ग्रॅमचे डोरले, १ ग्रॅमची सटी, १ ग्रॅमची अंगठी, १५ ते २० ग्रॅमचा सोन्याचा तुकडा, पायातील चांदीचे साखळ्या आणि जुनी पोत, असा साधारण 71 हजाराचा ऐवज लंपास केलेला होता. या संदर्भात शरद वाणी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound