‘1 डिसेंबर पासून शाळा सुरु होणारच’ – शिक्षण विभाग निर्णयावर ठाम

मुंबई प्रतिनिधी | राज्यातील पहिली सातवी वर्गाच्या शाळा डिसेंबर पासून सुरू होणार असून शासन निर्णय शिक्षण विभागाने जारी केला आहे.

आगामी काळात हा ‘ओमिक्रॉन’ विषाणू आणि रुग्णांमध्ये झपाट्याने प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार सध्या शाळा सुरू करण्याबाबत कुठलाही निर्णय नसल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. मात्र सुरक्षिततेच्या उपाययोजना करत सध्या शाळा सुरू करण्यास हरकत नसल्याचं कोव्हीड टास्क फोर्स कडून सांगण्यात आलं आहे. मार्गदर्शक सूचनांसह शिक्षण विभागाने शासन निर्णय व आदेश जारी केले आहेत. शाळांमध्ये त्याचं काटेकोरपणे पालन केल्यास या विषाणूचा धोका फारसा नसल्याचेही डॉक्टरांचं म्हणणं आहे.

\
काही पालक, सामाजिक आणि शिक्षक संघटना शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाने फेर विचार करावा असे मत मांडले आहे. मात्र 1 डिसेंबर पासून शाळा सुरू करण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून राज्यातील शाळांना देण्यात आले आहेत

दोन विद्यार्थ्यांमध्ये किमान सहा फूट अंतर, प्रत्येकाने मास्क घालणे, वारंवार हात धुवाणे, शाळेत स्वच्छता ठेवणे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे लसीकरण पूर्ण असावे, शाळांमध्ये बायोमेट्रिक उपस्थितिची पद्धतीचा अवलंब करू नये, शाळेत गर्दी होणार नाही असे उपक्रम टाळावेत. कोणतीही लक्षणे नाहीत अशाच व्यक्तींना शाळेच्या आवारात किंवा वर्गात अनुमती द्यावी, आजारी असेल तर त्यांनी शाळेत येऊ नये, आवश्यक नियमांचे पालन करावे, यासह अनेक मार्गदर्शक सूचना शिक्षण विभागाच्या शासन निर्णयात आहेत.

Protected Content