चाळीसगाव, प्रतिनिधी | शहरातील चार वर्षीय अल्पवयीन मुलीवर एकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना रात्री उघडकीला आली आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव शहरातील चार वर्षीय अल्पवयीन मुलीला बिस्किटचा पुडा खायला घेऊन देतो असे सांगून चाळीसगाव रेल्वे स्थानकाजवळ घेऊन गेला. व तिच्यावर अत्याचार केल्याची थरारक घटना काल रात्री ९ ते १० वाजताच्या सुमारास घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान चार दिवसांपूर्वीच घडलेली घटना अजून ज्वलंत असताना पुन्हा घडलेल्या या घटनेने चाळीसगावकर हादरून गेले आहेत. याप्रकरणी शहर पोलिसांनी सावळाराम भानुदास शिंदे रा. लोंढरे ता. नांदगाव जि. नाशिक या आरोपीला ताब्यात घेतले असून त्यावर भादवी कलम ३६३, ३६६(अ), ३७६ (एबी) व पोस्को कायदा अंतर्गत ४, ५ (एम), ६, ८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. दरम्यान आरोपी हा पिडीतांचा दुरचा नातेवाईकच असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि विशाल टकले हे करीत आहेत.