Home धर्म-समाज यावल येथे ‘मनसे”ने साजरा केला संविधान दिवस

यावल येथे ‘मनसे”ने साजरा केला संविधान दिवस

0
35


यावल प्रतिनिधी | यावल येथे तहसील कार्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संविधान दिवस साजरा करण्यात आला,

यावल तालुक्यात विविध ठिकाणी शासकीय कार्यालय, समाजसेवी संघटना आणि राजकिय पक्षाच्यावतीने भारतीय संविधान दिवस साजरा करण्यात आला. यावल तहसील कार्यालयात ‘मनसे”ने संविधान दिन साजरा केला. याप्रसंगी तहसीलदार महेश पवार व पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक जितेन्द्र खैरनार यांना भारतीय संविधान भेट करण्यात आली,

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रावेर लोकसभा क्षेत्राचे जिल्हाध्यक्ष जनहित चेतन अढळकर, यावल चोपडा क्षेत्राचे जिल्हाध्यक्ष कमलाकर घारु शहराध्यक्ष किशोर नन्नवरे उप शहराध्यक्ष आबिद कच्छी, तालुका उपाध्यक्ष श्याम पवार, तालुका उपाध्यक्ष अनिल सपकाळे, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष गौरव कोळी, जितु कोळी, महेश घारू, कुणाल गजरे, जयेश सावकारे, विपुल येवले आदी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.


Protected Content

Play sound