भडगाव, प्रतिनिधी | तालुक्यातील गिरड येथील जवाहर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक तथा अहिराणी साहित्यिक कवी रमेश धनगर यांची नाशिक येथे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी निवड झाली आहे.
तालुक्यातील गिरड येथील जवाहर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक तथा अहिराणी साहित्यिक कवी रमेश धनगर यांची ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी निवड करण्यात आली आहे. हा संमेलन नाशिक येथे होणाऱ आहे. यात तो ‘जागर अहिरानी मायना’ ही अहिराणी काव्यरचना सादर करणार आहेत. रमेश धनगर हे बातमीदार असून त्यांनी यापूर्वी ९० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवली तसेच विविध राज्यस्तरीय कवी संमेलनांमध्ये काव्य वाचनासाठी सहभाग नोंदवला आहे. त्यांच्या या निवडीबद्दल किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील, जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या संचालिका डॉ. पूनम पाटील, अप्पर सचिव अवर सचिव बांधकाम विभाग मंत्रालय चे प्रशांत पाटील, महामंडळाचे सदस्य प्राचार्य तानसेन जगताप, पहिले विश्व अहिरानी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बापूसाहेब हटकर, प्राचार्य एस व्ही शिंदे व इतर साहित्यिक सांस्कृतिक सामाजिक पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.