दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही बाधित रूग्ण आढळला नाही

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरातून एकही बाधित रूग्ण आढळला नाही. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

 

जळगाव जिल्ह्यात आज एकही बाधित रूग्ण आढळला नाही. सध्या जिल्ह्यात पाच रूग्ण उपचार घेत आहे. आजपर्यंत जिल्ह्यात एकुण १ लाख ४२ हजार ७८९ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २०७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ५७७ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!