बनावट फेसबुकद्वारे तरूणाची बदनामी; सायबर पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । फेसबुकवर अज्ञात व्यक्तीने बनावट अकाऊंट तयार करून सोशल मीडियात तरूणांची बदनामी केल्याचा प्रकार समोर १५ नोव्हेंबर रोजी समोर आला. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, वरदान सिंग ठाकूरसिंग चव्हाण (वय-३२) रा. प्रसाद नगर, चोपडा जि. जळगाव हा तरूण शिक्षण घेत आहे. अज्ञात व्यक्तीने वरदानसिंग चव्हाण यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट १५ नोव्हेंबर रोजी तयार केले. त्यानंतर चव्हाण यांच्या ओळखीच्या लोकांना संदेश पाठवून बदनामी करत असल्याचे समोर आले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर चव्हाण यांनी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून जळगाव सायबर पोलीस ठाण्यात बुधवार १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.

Protected Content