Home Cities यावल यावल तालुक्यातून अल्पवयीन मुलीला पळविले; पोलीसात गुन्हा दाखल

यावल तालुक्यातून अल्पवयीन मुलीला पळविले; पोलीसात गुन्हा दाखल


यावल प्रतिनिधी । यावल तालुक्यातील एका गावात राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फसूल लावून पळवून नेल्याचा प्रकार १२ नोव्हेंबर रोजी उघडकीला आला. शोधाशोध करून मुलगी न मिळाल्याने अखेर बुधवारी १७ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजता यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील आदीवासी भागात राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह राहते. ११ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजता सर्वजण जेवण करून घरात झोपले. मध्यरात्रीच्य सुमारास अज्ञात व्यक्तीने १६ वर्षीय मुलीला फुस लावून पळवून नेल्याचे १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आले. मुलीचा परिसरात व नातेवाईकांकडे शोधाशोध केली परंतू कोठेच आढळून आली नाही. अखेर बुधवार १७ नोव्हेंबर रोजी पिडीत मुलीच्या वडीलांनी यावल पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि विनोद खांडबहाले करीत आहे.


Protected Content

Play sound