Home Cities जळगाव नशिराबाद येथे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला अभिवादन

नशिराबाद येथे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला अभिवादन

0
32


नशिराबाद प्रतिनिधी । हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त नशिराबाद बसस्थानक येथील शिवसेना कार्यालयात बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नशिराबाद बस स्थानकावरील शिवसेना कार्यालयात बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले.यावेळी बस स्थानकावर लावण्यात आलेल्या फलकाजवळही मेणबत्तीची ज्योत तेववून बाळासाहेबांच्या स्मृती दिनानिमित्त स्मृतीला उजाळा देत आपल्या शिवसैनिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी युवासेना शहर प्रमुख चेतन बर्हाटे यांनी बाळासाहेब यांचे विचार उपस्थित शिवसैनिकांना सांगून शिवसेना पक्षाला बळकट करण्यासाठी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख विकास धनगर, चंदुदादा भोळे, माजी सरपंच विकास पाटील, विनायक धर्माधिकारी, आबा माळी, महेंद्र कोळी, कैलास नेरकर, बंडु रत्नपारखे, नितीन बेंडवाल, बापु चौधरी, मोहन कोलते, मनोज देशमुख, दिनेश माळी, सोहन पाटील, सतीश रोटे, भुषण कोल्हे, हरीष येवले, पांडु बाविस्कर, मयुर देवरे, शुभम सोनार, आबा सोनार, निलेश धनगर आदींसह अनेक शिवसैनिकांची उपस्थिती होती.


Protected Content

Play sound