जळगाव प्रतिनिधी । हनुमान नगरातून घरासमोरून दोन लाख रूपये किंमतीची बुलेट अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, शहरातील हनुमान नगर येथे सिध्दिविनायक शाळेजवळ राजेंद्र नवल पाटील वय ३४ हे वास्तव्यास आहेत. रविवारी १४ नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे राजेंद्र पाटील यांनी त्यांची (एम.एच.१९ सी.एच.११०१) या क्रमांकाची बुलेट उभी केली होती. दुसर्या दिवशी सकाळी १५ नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास राजेंद्र पाटील हे कामानिमित्ताने बाहेर जाण्यासाठी निघाले असता, त्यांना घरासमोर उभी त्यांची बुलेट दिसून आली नाही. परिसरात तसेच इतरत्र सर्वत्र शोध घेवूनही दुचाकी मिळून न आल्याने राजेंद्र पाटील यांनी याबाबत मंगळवारी एमआयडीसी पोलिात तक्रार दिली. या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक मिलिंद सोनवणे करीत आहेत.