Home Cities धरणगाव पिंप्री खुर्द येथे मोबाईल दुकान फोडले; धरणगाव पोलीसात गुन्हा दाखल

पिंप्री खुर्द येथे मोबाईल दुकान फोडले; धरणगाव पोलीसात गुन्हा दाखल

0
120


धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील पिंप्री खुर्द येथील मोबाईल दुकान फोडून ईलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि डीव्हिआर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

 

याबाबत माहिती अशी की, किशोर परमानंद खामनेकर (वय-५०) रा. गुरूकुल कॉलनी, एरंडोल हे आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. त्यांचे धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथे आर्यन मोबाईल ॲण्ड इलेक्ट्रिक दुकान आहे. १६ नोव्हेंबर रेाजी रात्री ७ वाजेच्या सुमारास दुकान बंद असतांना अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर वाकवून दुकानातील ईलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि डीव्हिआर चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी किशोर खामनेकर यांच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्या अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ राजेंद्र कोळी करीत आहे.

 


Protected Content

Play sound