शहरात विना परवानगी फलक लावणार्‍या ४ जणांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील विविध भागात परवानगी न घेता लावलेल्या फलकांवर शुक्रवारी १२ नोव्हेंबर रोजी महापालिकेने धडक कारवाई केली होती. याप्रकरणी चार जणांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, जळगाव शहरातील बहिणाबाई चौकातील लेवा बोर्डींग, बसस्थानक ते आकाशवाणी चौकापर्यंत रस्त्याच्या दुभाजकात तसेच ख्वॉजामिया चौक परिसरात काही जणांनी महापालिकेची परवानगी न घेता विविध जाहीरातींचे, शुभेच्छांचे फलक लावले होते. महापालिकेच्या पथकाने शुक्रवारी कारवाईची मोहिम राबविली असता सदर फलकांबाबबत कुठलीही परवानगी घेतलेली नसल्याचे आढळून आले. त्यानुसार महापालिकेने कारवाई करुन सर्व फलक जप्त केले. याप्रकरणी रविवारी महापालिका कर्मचारी युवराज नारखेडे यांच्या फिर्यादीवरुन फलक लावणार्‍या चेतन किशोर शिंपी रा. पोलीस कॉलनी, चंदू आण्णानगर, निलेश संजय जोशी, सुनील विजय देशमुख, मिलिंद रमेश नाईक तिघे रा. जळगाव या चार जणांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक उमेश पाटील हे करीत आहेत.

Protected Content