अमळनेर, प्रतिनिधी | शहरात एस.टी. कामगारांचा सुरू असलेला बेमुदत संपात सहभागी होऊन संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक शाम पाटील यांनी विविध मागण्यांबाबत चर्चा केली.
एस. टी. कर्मचाऱ्यांना शासनात विलिनीकरण करावे यासाठी कामगारांकडून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. याचाच भाग म्हणून अमळनेर आगारातील कर्मचारी ह्या संप करत आहेत. या संपाला म.से.स. व संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक शाम पाटील यांनी एस.टी.कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. व या संपाला आमचा जाहीर पाठिंबा असल्याचे सुतोवाच केले. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व परिवहनमंत्री अनिल परब यांनी लवकरात लवकर या संपावर तोडगा काढावा यासाठी संभाजी ब्रिगेड प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी किरण पाटील, अक्षय चव्हाण, तेजस पवार, अमोल पाटील, दर्पण वाघ, विशाल पाटील, उज्वल मोरे, तेजस वानखेडे व राहूल पाटील आदी उपस्थित होते.