यावल प्रतिनिधी । शहरातील जिल्हा आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प कार्यालयात प्रकल्पस्तरीय नियोजन आढावा समितीची बैठक जिल्हा प्रकल्प अधिकारी विनीता सोनवणे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.
या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात आदीवासी प्रकल्पाचे जिल्हा कार्यालय असतांना चोपडा, यावल आणि रावेर तालुक्यात आदिवासी विभागाचे शासनाचे स्वत:च्या मालकीचे वसतीगृह नसल्याने विद्यार्थ्यांसाठी विविध समस्या व अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यातील आदीवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांची दिवसंदिवस कमी होत असलेली पटसंख्या ही चिंतेचा विषय असून या विषयाकडे आपण सर्वांनी अधीक गांभीर्याने घेणे अत्यंत गरजेचे असल्याची माहीती यावेळी देण्यात आली. प्रकल्पस्तरीय समितीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष डॉ. चंद्रकांत बारेला यांनी बोलतांना दिली.
याप्रसंगी प्रकल्पस्तरिय समितीच्या नवनियुक्त जिल्हाध्यक्ष तथा समिती अशासकीय सदस्यांचे स्वागत सत्कार करण्यात आले. यावेळी प्रकल्पस्तरिय समितीचे अध्यक्ष डॉ .चंद्रकांत बारेला, सदस्य एम.बी. तडवी, जुबेदा तडवी, जफरूल्ला जमादार, संजु जमादार, मासुम रहेमान तडवी, प्रताप पावरा हे बैठकीस उपस्थित होते.