दुचाकीच्या धडकेत कोळन्हावी येथील प्रौढ जखमी; यावल पोलीसात तक्रार दाखल

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील कोळन्हावी येथील प्रौढ विदगावकडून कोळन्हावीकडे पायी जात असतांना मागुन दुचाकीवरील तिघांनी जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी झाले आहे. त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी यावल पोलीसात तक्रार दाखल केली आहे.

 

सुभाष बळीराम सोळुंके (वय ५०) रा. कोळन्हावी ता. यावल असे जखमी झालेल्या प्रौढ व्यक्तीचे नाव आहे. सुभाष सोळुंखे यांचे गावातील नातेवाईकांमध्ये जुना वाद आहे. सुभाष सोळुंखे हे मंगळवारी ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता विदगाव येथून कोळन्हावी येथे पायी जात होते. त्यावेळी जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी गावातील आबा मुकुंद सोळुंके, गोटू जनार्दन सोळुंके आणि भुरा बाबुराव सोळुंके हे दुचाकीवरून सुभाष सोळुंके यांना मागून धडक दिली. यात ते जखमी झाले दरम्यान सुभाष सोळुंके यांचा मुलगा पवन त्याठिकाणी आला असता. या तिघांनी त्याला जिवेठार मारण्याची धमकी दिली. जखमी अवस्थेत सुभाष सोळुंके यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आला आहे. या घटनेप्रकरणी यावल पोलिसात तक्रार दाखल करण्यात आले आहे.

 

Protected Content