निलेश राणे विरुद्ध कारवाई करा : जामनेर तालुका शिवसेनेची मागणी

जामनेर प्रतिनिधी | जळगाव जिल्हा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याबाबत भाजपचे नेते निलेश राणे यांनी ट्विटर या सोशल मीडियाद्वारे आक्षेपार्ह लिखाण करून त्यांची बदनामी केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ जामनेर तालुका शिवसेनातर्फे पोलीस उपनिरीक्षक अरुण राठोड यांना लेखी निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

 

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या बद्दल माजी खासदार निलेश राणे यांनी ट्वीटरवर आक्षेपार्ह पोस्ट केली आहे. याचा निषेध जामनेर तालुका शिवसेनेतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला आहे. तसेच आ. निलेश राणेंवर कारवाई करण्यात यावी मागणी करण्यात आली. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अॅड. भरत पवार, शिवसेना तालुका संघटक सुधाकर सराफ, शहर प्रमुख उत्तर विभाग अतुल सोनवणे, शहर प्रमुख उत्तर विभाग ज्ञानेश्वर जंजाळ, महेंद्र बिराडे, सुरेश चव्हाण यांच्यासह शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.

 

जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एका कार्यक्रमात कव्वाली गायन केले होते. या कार्यक्रमाचे संदर्भ घेऊन आमदार निलेश राणे यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंट वरून जळगाव पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या बदनामी करणारे ट्विट केले आहे. या आक्षेपार्ह लिखाणामुळे त्यांची बदनामी करून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामुळे शिवसैनिकांचे मनं दुखावली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणीच्या निवेदनाद्वारे जामनेर तालुका शिवसेनातर्फे करण्यात आली आहे.

Protected Content