Home क्राईम वाकडी येथील महिलेचा विनयभंग; दोन जणांवर गुन्हा दाखल

वाकडी येथील महिलेचा विनयभंग; दोन जणांवर गुन्हा दाखल


पहूर ता. जामनेर प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील वाकडी येथील महिला शेतात काम करत असतांना शेताच्या वादातून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील वाकडी येथील महिला आपल्या कुटुंबियांसह राहते. ६ नोव्हेंबर रोजी त्या पती व मुलासह वाकडी शिवारातील शेतात कपाशी वेचण्याचे काम करत असतांना संशयित आरोपी वसीम शहर सिकंदर शहा (वय-३५) रा. वाकडी आणि शेरू शहा दिल शहा (वय-३२) रा. खामगाव जि. बुलढाणा हे शेतात येवून ही शेती आमची आहे, शेतातून निघून जा असे सांगून महिलेला शिवीगाळ करून विनयभंग केला. तर महिलेचे पती आणि मुलाला मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी महिेलेच्या फिर्यादीवरून दोघांवर पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रविण चौधरी करीत आहे.


Protected Content

Play sound