Home क्राईम निमखेडी शिवारात एकाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण

निमखेडी शिवारात एकाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण


जळगाव प्रतिनिधी । शेजारी राहणाऱ्या व्यक्तीमुळे घर विक्री केले जात असल्याचा संशयावरून एकाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुका पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील निमखेडी परिसरातील शिवधाम मंदीर जवळ रविंद्र भिवा सोनवणे हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. त्यांच्या शेजारी महेंद्र नामदेव रोकडे राहतात. महेंद्र रोकडे यांचे घर विक्रीला काढले आहे, याला कारणीभूत रविंद्र सोनवणे असल्याचा संशयावरून महेंद्र रोकडे याने सोनवणे यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली. जखमीवस्थेत रविंद्र सोनवणे यांना तातडीने खासगी रूग्णालयात उचारार्थ दाखल करण्यात आले आहे. उपचार घेतल्यानंतर शनिवारी ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सोनवणे यांच्या जबाबावरून संशयित आरोपी महेंद्र रोकडे याच्या विरोधात जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक उमेश ठाकूर करीत आहे.

 


Protected Content

Play sound