Home क्राईम मोहाडी रोड परिसरात गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या संशयिताला अटक

मोहाडी रोड परिसरात गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या संशयिताला अटक

0
147

जळगाव प्रतिनिधी । शहरातील मोहाडी रोड परिसरात विनापरवाना गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील मोहाडी रोड परिसरात एकजण कंबरेला पिस्तूल लावून फिरत असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथे आज गुरूवारी २८ ऑक्टोबर रोजी ११ वाजता कारवाई करत संशयित आरोपी विकी महेंद्र कोळी (वय-२०) रा. समता नगर जळगाव याला तरूणला ताब्यात घेतले. त्यांच्या अंगाची झडाझडती घेतली असता त्यांच्या कमरेला २० हजार रूपये किंमतीचा गावठी पिस्तूल आढळून आले. पिस्तूल हस्तगत करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक किशोर राठोड यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ लक्ष्मण पाटील, पो.ना. रणजित जाधव, पो.ना. श्रीकृष्ण देशमुख, पो.कॉ. ईश्वर पाटील यांनी केली.

 


Protected Content

Play sound