जळगाव प्रतिनिधी । शहरातील विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक शाळा येथे सर्व शिक्षकांसाठी परीक्षा कालीन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक शाळा वाघ नगर येथे शिक्षकांसाठी अभिवृत्ती मानसिक व भावनिक कौशल्य या विषयावर समुपदेशक आनंदराव जाधव यांनी प्रशिक्षण घेतले. यात समुपदेशक आनंदराव जाधव यांनी अभिवृत्ती मानसिक आणि भावनिक कौशल्य याविषयी सोदाहरण प्रशिक्षण दिले. या दैनंदिन जीवनात आपापल्या आनंदी जीवन जगण्यासाठी प्रत्येक वेळी आलेल्या परिस्थितीला मोठ्या कौशल्याने तोंड कसे द्यावे आणि आपल्यासह इतरांच्या भावना कशा समजून घ्याव्या, संघटनेत काम करताना सकारात्मक राहून आपल्या भोवतालची परिस्थिती कशी बदलता येऊ शकते, याविषयी मार्गदर्शन केले. प्रश्नोत्तरांच्या स्वरुपात देखील त्यांनी शिक्षकांची संवाद साधला. यावेळी मुख्याध्यापक हेमराज पाटील तसेच समन्वयिका वैशाली पाटील, जयश्री वंडोळे आणि सर्व शिक्षक उपस्थित होते.